सावंतवाडीत असंघटित कामगारांना एजंटांकडून लाखोचा “चुना”…

2

भाजपामुळे प्रकार उघड; अधिकाऱ्यांसह एजंटावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

सावंतवाडी.ता,२८: असंघटित कामगारांना शासनाकडून वाटण्यात येणाऱ्या “किट”साठी प्रत्येकी दोनशे रुपये उकळणाऱ्या एजंटाचा प्रयत्न आज येथील भाजपाचे पदाधिकारी महेश सारंग यांनी उधळून लावला.या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांसह त्या एजंटावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा माघार घेणार नाही.असा इशारा त्यांनी दिला.या मागणीसाठी दुकाने निरिक्षक अधिकारी किरण कुबल यांना त्यांनी तब्बल दोन तास धारेवर धरले अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर कुबल यांनी तक्रार देण्याचे त्यांनी मान्य केल्यानंतर वातावरण निवळले.

तत्कालीन शिवसेना-भाजप शासनाकडून राज्यातील असंघटित कामगारांना ही योजना जाहीर करण्यात आली होती. यात कामगारांना किट वाटप बरोबर त्यांच्या लग्नासाठी, आजारासाठी, शिक्षणासाठी पैसे देण्यात येतात.ही योजना सुरू करण्यासाठी संबंधित एजंट लोकांनी गावातील कामगारांकडून दोनशे पाचशे हजार रुपये उकळले आणि त्यांना योजना लाभ देण्याचे मान्य केले.परंतु जे कामगार एजंट वगळून थेट कार्यालयात अथवा अधिकाऱ्यांकडे गेले.त्यांना ही योजनेचा लाभ दिला नाही.आज येथे आयोजित करण्यात आलेल्या वाटपाच्या कार्यक्रमात एजंटांकडून देण्यात आलेली लिस्ट ग्राह्य धरली जाईल, त्यांनाच लाभ दिला जाईल असे तेथील एका अधिकार्‍या चांगल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला.याची माहिती मिळताच भाजपाचे पदाधिकारी महेश सारंग तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी याठिकाणी धाव घेतली. व अधिकाऱ्यांना जाब विचारला व या प्रकरणात जबाबदार असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

2

4