विषारी द्रव्य प्राशन; या घटनेमुळे समाज कल्याण विभागात खळबळ
सावंतवाडी.ता,२८: येथील समाज कल्याण वसतिगृहात राहत असलेल्या एका विद्यार्थिनीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रकार केला.ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित मुलीला येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नेमका तिने हा प्रकार कशाला केला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबत वसतिगृहाच्या प्रशासनाकडून पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.या प्रकारामुळे समाज कल्याण विभागात खळबळ उडाली आहे.याबाबत वस्तीगृहाचे अधीक्षक गोरक्षनाथ पाटील यांनी दुजोरा दिला आहे.ते म्हणाले संबंधित मुलीने आपल्या वैयक्तिक कारणामुळे हा प्रकार केला आहे.गेले तीन दिवस ती नैराश्यात वाचवण्यासाठी आज सकाळी हा प्रकार केला व्यस्त झाल्यानंतर आम्ही तिला तात्काळ अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले.तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची रीतसर माहिती आम्ही पोलिस ठाण्याला दिली आहे.