Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअर्जुन रावराणे विद्यालयाची साक्षी रावराणे जिल्ह्यात प्रथम...

अर्जुन रावराणे विद्यालयाची साक्षी रावराणे जिल्ह्यात प्रथम…

वैभववाडी,ता.२८: राधारंग फाऊंडेशन परुळे ता-वेंगुर्ला व सुशिला गणेश गवाणकर पुरस्कृत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या प्रशालेची विद्यार्थीनी कु. साक्षी रविंद्र रावराणे इयत्ता नववी हिने प्रथम क्रमांक पटकावला. दि २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाच्या निमित्त राधारंग फाऊंडेशनच्या आयोजित कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला. उद्देश, प्रस्तावना, विश्लेषण, उपाययोजना, निराकरण, निरिक्षण, निष्कर्ष या मुद्द्यांचा विचार करून *”भुकेसाठी एक दाना”* या विषयावर १००० शब्दमर्यादेत तिने निबंध सादर केला होता. तिला श्री. चोरगे एम. एस. यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल संस्था अधिक्षक श्री जयेंद्र रावराणे साहेब , प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments