बांदा.ता,२९: बांदा येथील रॉयल कॅश्यू दुकानफोडीतील पाच संशयितांना बांदा पोलीसांनी राजापूर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुंब्रा – ठाणे येथील हे सर्व सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीसांनी दिली. मोहम्मद इरफान कद्दुस शेख (१९, रा. मुंबई), रिजवान अहमद मकबुल खान (२७, दिवा – ठाणे), मुमताज मेहराज शेख (२०, रा. मुंब्रा), एजाजअली सपातअली सिद्दिकी (२५, रा. ठाणे) व मुश्ताक महारुख खान (३४, रा. मुंब्रा) अशी संशयितांची नावे आहेत.
बांदा – आंगडीवाडी येथील नसीरखान अब्दुलखान बिजली यांच्या रॉयल कॅश्यू प्लाझा या दुकानात चोरी २१ जानेवारी रोजी चोरी झाली होती. यात २० हजार रुपयांची रोकड व २० हजार रुपयांचे काजूगर अशी एकूण ४० हजार रुपयांची चोरी झाली होती. बिजली हे पुणे येथे आपल्या नातलगांकडे गेल्याची संधी साधून चोरट्यांनी २१ जानेवारीच्या मध्यरात्री दुकानात चोरी केली होती. चोरटे सीसीटीव्हीत कॅमेराबद्ध झाले होते.
राजापूर पोलीसांनी चोरीप्रकरणी या संशयितांना ताब्यात घेतले होते. राजापूर न्यायालयाकडून पाचही संशयितांना दुकानफोडी प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आज त्यांना सावंतवाडी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
बांदा येथील दुकानफोडी प्रकरणात पाच संशयित ताब्यात
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES