डोक्यात स्टंम्प मारल्याप्रकरणी एकाला न्यायालयीन कोठडी…

2

सावंतवाडी ता.२८:  डोक्यात स्टम्प मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या भगवान महादेव घाडी(२५) रा.माजगाव,या संशयिताला आज येथील न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.ही घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती.यात ओंकार सुभाष राणे,रा.माजगाव हा युवक गंभीर जखमी झाला होता.दरम्यान याप्रकरणी संशयिताला काल अटक करण्यात आली होती.आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की,क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून संशयिताने ओंकार राणे या युवकाच्या डोक्यावर स्टंपने वार केला यात तो गंभीर जखमी झाला होता.त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे दाखल करण्यात आले होते.तर सावंतवाडी पोलिस ठाण्यात ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान याबाबतचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना काल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर ३२६ अन्वये गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

0

4