घरपट्टी,पाणीपट्टीत वाढ न करता सावंतवाडीकरांना दिलासा…

2

३१ कोटीचा अर्थसंकल्प सादर;रस्ते,गटार पाण्यासाठी ११ लाखाची तरतूद…

सावंतवाडी,ता.२८: पाणीपट्टी तसेच घरपट्टी यांच्यात कोणतीही दरवाढ न करता आज येथील पालिकेचा तब्बल ३१ कोटी ६६ लाखाचा शिल्लकी अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यावेळी कर्ज बोजाची नोंद करण्यासाठी तसेच मैला वाहतूक करणाऱ्या गाडीचे भाडे काही प्रमाणात रक्कम वाढविण्यात आले, तर नळ कनेक्शन घेताना मातीचे रस्ते मोफत खोदण्यासाठी परवानगी देण्यात आली. याला विरोधी नगरसेवकांनी विरोध केला.सावंतवाडी पालिकेचा अर्थसंकल्प आज येथील आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत मांडण्यात आला. प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली .
यावेळी झालेल्या चर्चेत पुढील अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली यात एकूण जमा ५६ कोटी ८४ लाख रुपये जमा होणार आहेत, त्यातून १५ कोटी महसूल खर्च, ४१ कोटी भांडवल खर्च, ५ कोटी रस्ते, १ कोटी गटारासाठी, ५ कोटी ८० लाख पाणीपुरवठा, ३ कोटी ६४ लाख घनकचरा व्यवस्थापनासाठी, ५ कोटी भाजी मार्केट, २५ लाख रुपये स्मशानभूमी, १५ लाख रुपये इ टाॅयलेटसाठी, १४ लाख रुपये विदयुतीकरणासाठी, ४० लाख रुपये सोलर सिस्टिम साठी आधी प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. तर व्यायाम शाळेसाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कोरगावकर यांनी दिली. यावेळी पाणीपुरवठा सभापती नासिर शेख आरोग्य सभापती परीमल नाईक, उदय नाईक, दिपाली समृद्धी विरनोडकर आदी उपस्थित होते.

0

4