शिरोडा येथील अक्षरोत्सव प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

2

वेंगुर्ले.ता.२६:मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयामध्ये आयोजित अक्षरोत्सव या हस्ताक्षर संग्राहक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी भाषा दिननिमित्त शिरोडा येथील या कार्यक्रमाला कवि श्री.विनय सौदागर हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रंथालयाचे कार्यवाह श्री सचिन गावडे, ग्रंथपाल सौ. अर्चना लोखंडे, वाचक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. पत्रकार निकेत पावसकर यांच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांच्या संग्रहाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. उद्घाटन झाल्यानंतर दिवसभर हे प्रदर्शन सुरू ठेवले होते. यावेळी देश आणि परदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश सर्वाना पहायला मिळाले.

3

4