रांगणातुळसूली येथील श्री देवी भाव‌ई मंदिराचा २ मार्च ला भावई परमेश्वरी पु़ऩ प्रतिष्ठा सोहळा…

2

कुडाळ.ता.२८:कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसूली गावची ग्रामदेवता श्री देवी भावई मंदिराचा पुनःप्रतिष्ठा सोहळा गुरूवार २ मार्च ते शनिवार ७ मार्च पर्यंत विविध सांस्कृतिक व धार्मिंक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या कार्यक्रमास सर्व भाविक -भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देवी भावई देवस्थान कमिटी व रांगणातुळसूली ग्रामस्थ व गावकरी मंडळींनी केले आहे.

रांगणातुळसूली गावचे आराध्य दैवत श्री जंगदंबा श्री देवी भावई मंदिराचा पुनः प्रतिष्ठा सोहळा विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार आहे. सोमवार २ मार्च रोजी सकाळी ९ वा. सक्षौर प्रायश्चित्त, यजमान, देहशुध्दी, देवतावंदन, गार्‍हाणे, यजमान पुण्याहवाचन, संकल्प, संभारदान, परोहित पुण्याहवाचन, मंडपप्रतिष्ठा, नैवेद्यप्रसाद, जलाधिवास, दुपारी १.३० वा. नैवेद्य प्रसाद, सायं. ६ ते ७ वा. श्री गणेश भजन मंडळ गोवा यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ८ ते १० वा. ह.भ.प. बाल किर्तनकार कु.ॠचा पिळणकर माणगांव यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
मंगळवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ८ वा. देवता जलाधिवास, ब्रम्हांदी मंडळ देवता, देवता स्थापना, देवता शय्यधिवास, अग्निस्थापना, गृहस्थापना, अन्वाधान, वास्तुहवन, ग्रहयज्ञ, नैवेद्य, प्रसाद, तुलसी पुजन, दुपारी १.३० वा. नैवेद्य व महाप्रसाद, सायं. ६ ते ८ वा. ह.भ.प. पद्मनाथ परब बुवा, हिर्लोक यांचे सुश्राव्य किर्तन, रात्रौ ८ ते १० वा. श्रींची इच्छा काकामंच तेंडोली श्री देव रवळनाथ यांचे सामाजिक नाटक संगीत शारदा दिग्दर्शक सुधिर भागवत, लेखक कै. गो. ब. देवोल. बुधवार दि. ४ मार्च रोजी सकाळी ८ वा. स्थापित देवता पुजन, अग्निपुजन, पर्यायहवन , शिखर कलश स्थापना विधी मूहुर्त, ११.४५ वा. देवता प्रबोध जगद्गुरू शंकराचार्य महाराज करविरपीठ कोल्हापूर यांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रम , दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायं. ७ ते ९ वा. ह.भ.प श्री हरिहर नातू बुवा पुणे यांचे सुश्राव्य किर्तन, रात्रौ ९ ते १० वा. ५१ पखवाज वादकांचा संगीत अविष्कार सादरकर्ते ओम नादब्रम्ह संगीत विद्यालयाचे विद्यार्थी गुरूवर्य सिध्देश कुडतरकर ( घावनळे) गायन साथ पंडित श्री सुनिल पाडगांवकर ( मळगांव).शुक्रवार दि. ६ रोजी सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी १.३० वा. आरती व महाप्रसाद, सायं. ६ ते ७ वा. महालक्ष्मी भजन मंडळ नारूर यांचे सुश्राव्य भजन बुवा रवी गोसावी, रात्रौ ८ वा. पार्सेकर दशावतार दि. ७ रोजी सायं. ६ वा. यक्षिणी दशावतार नाट्य मंडळ, माणगांव यांचा नाट्य प्रयोग, रात्रौ ९ ते १२वा. २० -२० डबलबारी सामना श्री. भुतेश्वर प्रा. भजन मंडळ खुडी- देवगड, बुवा श्री संतोष जोईल, गुरूवर्य श्री श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य, पखवाज श्याम तांबे, श्री रामेश्वर विघ्नेश्वर प्रासादिक भजन मंडळ घावनळे ( खुटवळवाडी) बुवा श्री शंकर ( आनंद) ज. कानडे, गुरूवर्य कै. काशिराम परब यांचे शिष्य, पखवाज सिध्देश कुडतरकर, तबला पुष्कराज धुरी असे विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन रांगणातुळसूली ग्रामस्थ, गावकर मंडळी व देवस्थान कमिटीने केले आहे.

11

4