कांदळगावात तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या…

2

काल मध्यरात्रीची घटना ; पोलिसांत आकस्मिक मृत्यू नोंद…

मालवण, ता. २८ : तालुक्यातील कांदळगाव येथील दत्तात्रय अनंत राणे  (वय- ३८) या तरुणाने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
दरम्यान पोलिस प्रशासनाने येथील आपत्कालीन ग्रुप पथकाच्या मदतीने मध्यरात्री विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.
विहिरीची खोली सुमारे ५० फूट असल्याने तसेच विहीरीत उतरण्यासाठी जागा नसल्याने स्थानिक हतबल झाले. मसुरे पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी प्रमोद नाईक, पोलिस कर्मचारी श्री. फरांदे, श्री. जायभाय यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली.
आपत्कालीन ग्रुप मालवणला रात्री ११. ३० बोलविण्यात आले. विहीर खूप खोल तसेच पाण्यात उतरण्यासाठी काही मार्ग नसल्याने मोहिमेत खूप अडथळे आले. परंतु एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. आपत्कालीन ग्रुप पथकामध्ये दामोदर तोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव खोबरेकर, देवेंद्र मराळ, अक्षय मराळ, विश्वास आचरेकर, भूषण परब, तुषार मराळ सहभागी झाले होते. मसुरे पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

2

4