Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासांगुळवाडीतील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील दोन वृद्धाश्रमाला दिली भेट...

सांगुळवाडीतील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील दोन वृद्धाश्रमाला दिली भेट…

वैभववाडी, ता.२९: सामाजिक बांधिलकी जोपासत सांगुळवाडी येथील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील दोन वृद्धाश्रमाला भेट देत फळे व धान्य वाटप केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवजयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम व कनेडी येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी आश्रमातील सर्व वृद्धांना खाऊ, फळे वाटप केले. तसेच संस्था प्रतिनिधींकडे तांदूळ, गहू, साखर सुपूर्द केले. त्याचबरोबर वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध यांच्याशी त्यांनी सुसंवाद साधत विचारांची देवाण-घेवाण केली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य चेतन वाडेकर, प्राध्यापिका नम्रता तांबे, प्रा. श्रद्धा मयेकर, प्रा. अभिजित शेटे, प्रा. अक्षय देवलकर, सायली पेजे, तसेच विद्यार्थी सुजाता कुथीनो, प्रणव पाटील, विनायक भारतीबुआ, राहुल पाटील, अल्फिया मुल्ला, अनिकेत भारगुडे, प्रणाली कोडग तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो सांगुळवाडी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वृध्दाश्रमाला भेट

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments