वैभववाडी रेल्वे स्थानकात कुत्र्यांचा सुळसुळाट…

2

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रवाशांमध्ये भीतीचे सावट…

वैभववाडी/पंकज मोरे.ता,२९: भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच भटक्या कुत्र्यांनी वैभववाडी रेल्वे स्थानकाचा आश्रय घेतल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
तालुक्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलिकडे तापमानात कमालीची वाढ होत असल्याने आश्रयासाठी भटके कुत्रे रेल्वे स्थानकात बसणे पसंत करीत आहेत. मात्र या कुत्र्यांचा उपद्रव प्रवाशांना होत आहे. स्थानकात बसणेही प्रवाशांना मुश्किल बनले आहे. मात्र याकडे रेल्वे प्रशासन गांभिर्याने लक्ष देत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. तरी या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

2

4