Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या क्रीडा महोत्सव स्पर्धांचा निकाल जाहीर...

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या क्रीडा महोत्सव स्पर्धांचा निकाल जाहीर…

ओरोस ता.२९:  जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सव 2020 स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. या स्पर्धेत 453 गुणांपैकी सावंतवाडी तालुक्याने सर्वाधिक 109 गुण मिळवत स्पर्धेचे सर्वसाधारण जेतेपद पटकाविले आहे. त्यापाठोपाठ 84 गुण मिळवत देवगड तालुक्याने सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक यांच्याहस्ते या संघांना चषक देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सावंतवाडी गटविकास अधिकारी गजानन भोसले, देवगड गटविकास अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते.
या स्पर्धेत वैभववाडी तालुक्याने 73 गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. मालवण तालुका संघाने 56 गुण मिळविले. मुख्यालय पत्रकार संघाने 53 गुण मिळविले. कुडाळ संघाने 49 गुण, वेंगुर्ले संघाने 32 गुण, कणकवली संघाने 28 गुण, दोडामार्ग संघाने 14 गुण मिळविले. महिला गटात सावंतवाडी संघाने सर्वाधिक 69 गुण मिळविले. देवगड तालुक्याला 36 गुण मिळविले. त्या पाठोपाठ कणकवली 25 गुण, कुडाळ 23 गुण, मालवण 20 गुण, वेंगुर्ले 15 गुण, दोडामार्ग 12 गुण, वैभववाडी 10 गुण मिळविले. पुरुष गटात सर्वाधिक वैभववाडी तालुक्याने 63 गुण मिळविले. देवगड तालुका 48 गुण, सावंतवाडी तालुका 40 गुण, मालवण 36 गुण, कुडाळ 26 गुण, वेंगुर्ले 17 गुण, मुख्यालय 7 गुण, कणकवली 3 गुण, दोडामार्ग 2 गुण असे गुण मिळविले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments