म्हापण येथे नरेंद्राचार्यजी महाराजांचा प्रवचन व दर्शन सोहळा उत्साहात…

2

वेंगुर्ले ता.२९:  तालुक्यातील म्हापण येथे सद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांचा पादुका पूजन,प्रवचन व दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.येथील बाजारपेठेत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शेकडोंच्या संख्येने भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.
या दर्शन सोहळ्याची सुरुवात सकाळी १०:०० वा. ध्वजारोहणाने झाली. जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका ढोल-ताशांच्या गजरात भजनाच्या सुरात डोहिवर कलश, झेंडे, पताका घेऊन मिरवणुकीने संत पिठावर आगमन झाले. सद्गुरु श्री व सिद्ध पादुकांचे संत पिठावर आगमन झाल्यावर मृदुंगमणी महेश सावंत यांनी घडविलेले १०६ शिष्यांनी मृदुंग मनात करून माध्यमांचे स्वागत केले.
त्यानंतर ज.न.म प्रवचनकार संतोष मोरे महाराजांचे श्राव्य प्रवचन झाले. त्यावेळी षडोपचार पद्धतीने ते म्हणाले आपल्या जीवनाची नाव पैलतीरावर येण्यासाठी गुरूंची साथ अतिशय महत्त्वाची आहे. गुरूंच्या आशीर्वादाने अशक्य ही शक्य होते. आपल्याला निर्गुण परमात्म्याची शक्ती करण्यासाठी पादुका प्रवचन दर्शन सोहळा माध्यम आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख व्यवस्थापक उदय रानभरे,जिवनी निरीक्षक संदीप नार्वेकर, प्रोटोकॉल संदीप भोकरे , जिल्हाध्यक्ष सेवा समिती अध्यक्ष दीपक खरुडे,जिल्हा पदाधिकारी व भक्तगण यांच्या उपस्थितीत दर्शन सोहळा संपन्न झाला.
संतोष मोरे प्रवचन करताना म्हणाले,शबरी सारखी आपली भक्ती असावी. राम येणार गुरूने सांगितले, मग राम येणारच एवढा दृढ विश्वास असला पाहिजे.राम येणार म्हणून वर्षानुवर्षे पाय घालून आतुरतेने वाट पाहत राहिली आणि शेवटी रामाच्या दर्शनाने तृप्त झाली. जगद्गुरु श्रीचं रूपांतर आल्यावर गुरुदत्तात्रयापासून गुरु परंपरेच शक्तीच्या सिद्ध पादुका मध्ये असते.
त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे प्रवचन ऑनलाइन झाले. त्यानंतर काही भक्तगणांना साधकदीक्षा देण्यात आली.शेवटी फुले उधळून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सर्व भाविक गुरु भक्तीने प्रसन्न होऊन, महाप्रसाद घेऊन आपल्या घरी गेले.

8

4