अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याप्रकरणी एकाला जामीन…

2

सावंतवाडी,ता.२९:अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास देऊन धमकी दिल्याप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने आज एकाची १५ हजार रुपयाच्या जामिनावर मुक्तता केली.गोविंद शंकर नाईक रा.आरोस असे त्याचे नाव आहे. याकामी अॅड.सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले. यातील फिर्यादी मुलगी अल्पवयीन असताना प्रेम संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने यातील संशयित हा तिला वारंवार धमकीचे मेसेज पाठवत होता. तसेच भेटण्यासाठी ये असे सांगत होता. दरम्यान तू मला विरोध केला तर मी तुला पकडून नेणार आणि आई-वडिलांना सांगितले तर त्यांना ठार करणार अशी त्यांनी धमकी दिली.

याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आज त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

8

4