जनशताब्दीच्या थांब्याला सावंतवाडी  तीन महिने मुदतवाढ…

2

खासदार विनायक राऊतांच्या प्रयत्नाला यश;ग्राहकांतून समाधान…

सावंतवाडी,ता.२९: सावंतवाडी(मळगांव) रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आलेल्या जनशताब्दीला उद्या दि.१ मार्च पासून तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे आता कायमस्वरूपी थांबा देण्यात यावा म्हणून खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न करत आहोत असे सांगितले.आता मे पर्यंत ही मुदत असेल असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

कोकण रेल्वे व्यवस्थापन आणि रेल्वे मंत्रालयाकडे खासदार विनायक राऊत यांनी जनशताब्दीला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर कायम स्वरुपी थांबा मीळावा म्हणुन प्रयत्न केला होता.प्रायोगिक तत्त्वावर सहा महिने थांबा मीळाला होता,ती मुदत आज संपली असताना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे, पण आम्ही कायम स्वरुपी थांबा मीळाला पाहिजे म्हणून आग्रही आहोत,असे खासदार राऊत यांनी बोलताना सांगितले .

जनशताब्दी एक्सप्रेसला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा नव्हता,तो मिळावा म्हणून प्रवासी संघटनेने आंदोलन केले होते. खासदार विनायक राऊत यांनी मागणी घेऊन रेल्वे मंत्रालय आणि कोकण रेल्वे व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सहा महिने जनशताब्दीला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला,हा सहा महिन्यासाठी थांबा मंजूर करण्यात आला होता.त्याची मुदत संपत असल्याने रेल्वे बुकिंग बंद करण्यात आले होते

खासदार विनायक राऊत यांनी जनशताब्दी एक्सप्रेस ला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी थांबा मिळावा म्हणून पुन्हा पाठपुरावा केला. जनशताब्दीला सुमारे साडेतीनशे प्रवासी आरक्षण या स्थानकावर होत असल्याने थांबा कायमस्वरूपी मिळावा म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी के सावंत यांनी खासदार राऊत यांचे लक्ष वेधले होते.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर या रेल्वेचे बुकिंग बंद करण्यात आले असून रेल्वे थांबा प्रायोगिक तत्वावर असल्याने पुढे चालू ठेवण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वे व्यवस्थापन आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. जनशताब्दी ला कायमस्वरूपी थांबा देण्यात यावा, अशी खासदार विनायक राऊत यांनी मागणी केली होती.

आज तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे तरीही सावंतवाडी रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी जनशताब्दी थांबवावी अशी मागणी केली आहे असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले .त्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी के सावंत ,भाई देऊलकर यांनी समाधान व्यक्त केले.खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांची मंत्रालयात भेट घेतली होती असे डी के सावंत यांनी सांगितले

4

4