सावंतवाडीत मोफत आयकर विवरण भरणा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

2

जम्प नेट आणि सिटीफर्स्ट फायनान्शिअल ॲडव्हायझर यांचे आयोजन…

सावंतवाडी ता.०१: जम्प नेट आणि सिटीफर्स्ट फायनान्शिअल ॲडव्हायझर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी घेण्यात आलेल्या मोफत आयकर विवरण भरणा शिबिराला तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दोन दिवस सुरू असलेल्या या शिबिरात दोनशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.दरम्यान या शिबिराला आज जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आणि पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर यांनी भेट देऊन सिटीफर्स्ट फायनान्शियल ॲडव्हायझर चे प्रमुख रंजन पेरीवाल आणि त्यांच्या टीमचे स्वागत केले.
यावेळी कोलगाव उपसरपंच बंड्या घोगळे,जम्प नेटचे संदीप नाटलेकर,जयराम जाधव,विनायक जाधव,प्रथमेश आळवे,प्रीतम लाड तसेच सिटीफर्स्ट फायनान्शिअल ॲडव्हायझर चे आशीष श्रीवास्तव,अंकित अग्रवाल,नितेश ढोलकिया ,दिवाकर जस्वाल,अक्षय मोहिते,यश भोसले आदी उपस्थित होते.

28

4