शिवसेना कणकवली शहर प्रमुख शेखर राणे यांना अटक

2

चेक बाउंस प्रकरण; बेंगलोर येथील पोलिसांची कारवाई…

कणकवली, ता.१: शिवसेना कणकवली शहर प्रमुख शेखर राणे याला कणकवली येथे रविवारी सकाळी बेंगलोर पोलिसांनी अटक केली. बेंगलोर येथील एका न्यायालयात शेखर राणे याच्याविरोधात 3 लाखांचा चेक बाऊन्स प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात तेथील न्यायालयाने राणे यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. त्यानुसार बेंगलोर येथील पोलिसांच्या पथकाने रविवारी सकाळीच ही कारवाई केली. अटकेनंतर शेखर राणे याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. घटनेची माहिती मिळताच शिवसेना आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी कणकवली पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. शेखर राणे याला अटक केल्यानंतर त्याबाबत कणकवली पोलिस स्टेशनमध्ये नोंद करत त्याला बेंगलोर येथे नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

7

4