शाळेची घंटा वाजली अन् मित्र मंडळी पुन्हा भेटली…

2

आदर्श विद्या मंदिर भुईबावडा विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

मुंबई/पंकज मोरे,ता.१:शाळेची घंटा वाजली अन् माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या वर्गात गर्दी केली. निमित्त होते मुंबई चेंबूर येथील राजहंस हॉटेल सभागृहात आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. तब्बल २० वर्षांनी एकमेकांना भेटले होते. शाळेतील जुन्या आठवणी तसेच शिक्षकांची झालेली भेट यामुळे सारे वातावरण भावुक झाले होते. एकाच बँचवर बसणारे मित्र ब-याच कालावधीनंतर एकत्र आल्यामुळे त्यांची गप्पांची छान मैफील जमली होती.
माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या शाळेला विसरत नाही. जिथे अभ्यासाचे धडे गिरवून जीवनात यशस्वी झालो ती पवित्र शाळा, तेथील शिक्षक आणि जिवाभावाची मित्रमंडळी यांची पुन्हा एकदा भेट घडविण्याचा हा सोहळा माजी विद्यार्थ्यांनी केला. माजी शिक्षक प्रा. जे. ए. पाटील, एस. एन. पाटील, आर. डी. लोंढे, टी. बी. कदम, ए. एम. दिक्षित यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र शाळेत गेलेल्या प्रत्येकाच्या मनात शाळा आणि शिक्षकांबद्दल आदर असतो. या आठवणींना उजाळा देण्यासाठी पहिली ते दहावी अशी दहा वर्षे एकत्र शिक्षण घेणारे २००१ च्या बॕचचे सुमारे २३ विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते.

फोटो- मुंबई येथील राजहंस हॉटेलच्या सभागृहात दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्यात मित्र व मैत्रीणी

16

4