Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआमदार विनायक मेटे यांची वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरास सदिच्छा भेट...

आमदार विनायक मेटे यांची वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरास सदिच्छा भेट…

वेंगुर्ले,ता.१: आमदार श्री. विनायक मेटे यांनी आज वेंगुर्ले येथील प्रसिद्ध श्री देवी सातेरी मंदिरास सदिच्छा भेट दिली आणि देवीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसर, मंदिराची स्थापत्य कला तसेच मंदिरात वर्षभर होणारे उत्सव यांची माहिती करून घेतली. या भेटीचे अवचित्य साधून मराठा समाज आणि श्री. सातेरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आम. मेटे यांचा सन्मान करण्यात आला. मंदिरातील या कार्यक्रमाला ट्रस्टचे रवींद्र परब, दाजी परब, सुनील परब, तसेच मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सिद्धेश परब, परबवाडा सरपंच पप्पू परब तसेच दादा ठाकूर, संदीप गवस, दिलीप परब, सहदेव परब यांच्यासह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments