तुळसच्या गौरी नाईक हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

2

‘गो गर्ल गो’चळवळीच्या प्रसाराकरिता धावणे स्पर्धा

वेंगुर्ले ता.१:
‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत *’गो गर्ल गो’* चळवळीच्या प्रसाराकरिता आयोजित १०० मि. धावणे स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावची सुकन्या कु.गौरी उत्तम नाईक हिची बालेवाडी-पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तुळसची कु.गौरी हि सध्या अणसुरपाल-अणसूर हायस्कुल मध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. तीने तालुकास्तरावरील स्पर्धेत द्वितीय व जिल्हास्तरावर ही द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशामुळे तीची बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे शाळेतील शिक्षकांकडून अभिनंदन होत आहे.

4

4