चपलेने मारण्याची भाषा बोलणार्‍या राऊतांचा निषेध…

2

राजन तेली ; ओजस शाळा बंद करून शिक्षण क्षेत्रातही ठाकरे सरकारचे राजकारण…

कणकवली, ता.२: ज्या शिवसैनिकांच्या पाठबळावर खासदार झाले, त्याच शिवसैनिकांना चपलेने मारा म्हणणार्‍या विनायक राऊतांचा आम्ही निषेध करत असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे केले. तसेच ओजस आंतरराष्ट्रीय शाळा बंद करून ठाकरे सरकार शिक्षण क्षेत्रातही राजकारण आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकरे सरकारचे सर्वच निर्णय कोकणवासीयांच्या विरोधातील आहेत असेही ते म्हणाले.
येथील भाजप कार्यालयात श्री.तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुदन बांदिवडेकर, जयदेव कदम आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.तेली म्हणाले, कोकणातून शिवसेनेने सर्वाधिक आमदार खासदार निवडून दिले. पण शिवसेनेला कोकणाचा विकास करता आला नाही. इथली गावे ओस पडायची वेळ आली. त्यामुळे रोजगार निर्माण करणार्‍या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. मात्र खासदार विनायक राऊत याच शिवसैनिकांना चपलेने मारा असे आदेश देतात हे चुकीचे आहे. राऊतांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
तेली म्हणाले, राज्यातील ठाकरे सरकार शिक्षण क्षेत्रातही राजकारण आणत आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळाच्या सर्व ओजस शाळा बंद करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. ओजस शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात चराठेवासीय आंदोलन करणार आहेत. त्याला भाजपचाही पूर्ण पाठिंबा असणार आहे.

4

4