भाजपाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भांबुरेंचा तडकाफडकी राजीनामा…

2

सावंतवाडी,ता.२:  पंधरवड्यापूर्वी शहराची जबाबदारी देत भाजपाकडून जाहीर करण्यात आलेले तालुकाध्यक्ष अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.वैयक्तिक कारणामुळे आपण पक्षासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
श्री.भांबुरे यांना पंधरवड्यापूर्वी या पदाचा कार्यभार देण्यात आला होता. त्यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष म्हणून पंचायत समिती सदस्य संदीप गावडे व महेश धुरी यांचीही निवड करण्यात आली होती. मात्र त्यांनी अचानक आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. याबाबत श्री भांबुरे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आपण वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले.

5

4