पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापुरातील पर्यटकाची मोती तलावात उडी…

2

उन्हाची काहिली झाल्यामुळे मद्याच्या नशेत प्रकार ;पोलिसांनी काढले तलावाबाहेर..

सावंतवाडी/शुभम धुरी,ता.०२: गेले दोन-तीन दिवस वाढत्या उष्म्याचा परिणाम आज सावंतवाडीत पाहायला मिळाला.कोल्हापूर येथून याठिकाणी पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक येथील एका हॉटेलमध्ये जेवायला थांबले असता,त्यातीलच एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाला उष्म्याचे चटके सहन झाले नाही.त्यामुळे त्याने आपल्या साथीदारांची नजर चुकून चक्क येथील मोती तलावात उडी घेत थंड पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला.दरम्यान हा प्रकार येथील काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची  माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.त्यानुसार पोलीस प्रमोद काळसेकर व पलक गवस यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले.दरम्यान त्या युवकाने मद्याच्या नशेत पोलिसांशी अरेरावीची भाषा केली.त्यामुळे अखेर श्री.काळसेकर यांनी आपली खाकी दाखवत वेळीचं त्याची नशा उतरवली.

याबाबत अधिक माहिती अशी की,कोल्हापूर येथून काही पर्यटक सावंतवाडी शहरात आले होते.दरम्यान ते एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते.त्यातील संबंधित युवक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे आज दुपारी वाढलेला उष्मा त्याला सहन झाला नाही. तर समोरच दिसणारे मोती तलावातले थंड पाणी पाहून त्याला पोहोण्याचा मोह आवरला नाही.त्यामुळे चक्क त्याने आपल्या साथीदारांची नजर चुकवून मोती तलावात उडी घेतली.काही वेळानंतर तो युवक पोहताना नागरिकांच्या निदर्शनास आला.दरम्यान त्याने उडी का घेतली? नेमका प्रकार काय आहे ? त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की काय ? ,असे अनेक प्रश्न त्याठिकाणी नागरिकांमधून उपस्थित होऊ लागले.मात्र तलावाकाठी वाढत चाललेली गर्दी पाहून त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्या ठिकाणी येऊन नेमके गर्दीच्या आत काय चालले हे पाहिले,तर त्यांना आपलाच मित्र चक्क मोती तलावात पोहताना दिसला.दरम्यान याबाबतची माहिती त्यांनी नागरिकांना दिली.तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही त्यांनी स्थानिकांना सांगितले.त्यानंतर सर्वांनी त्याला बाहेर येण्याची विनंती केली.मात्र त्याला वर चढता येत नव्हते.दरम्यान ही माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यात पोहोचताचं पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतल. व सर्वांनी एकमेकांच्या मदतीने कमरेचा पट्टा तलावात सोडून त्याला त्याच्या सहाय्याने बाहेर काढले.यावेळी त्याला तलावात उडी मारण्याचे कारण विचारले असता,मला गर्मी सहन झाली नाही.म्हणून मी तलावात उडी घेतली,असे त्यांने सांगितले. हे त्याचे अतिशयोक्तीचे बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिटला.

 

7

4