दहावीच्या परीक्षेस उद्यापासून सुरवात…

2

११ हजार ८८१ विद्यार्थी प्रविष्ट ; कॉपी रोखण्यासाठी सहा भरारी पथके नियुक्त…

ओरोस, ता: 2. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा मंगळवार 3 मार्च पासून सुरु होत आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11 हजार 881 विद्यार्थी दहावीसाठी प्रविष्ट झाले आहेत. हे विद्यार्थी जिल्ह्यातील 41 केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

या परिक्षे दरम्यान होणारे कॉपी प्रकार रोखण्यासाठी एकूण सहा भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षण शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, विशेष महिला भरारी पथक, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) सिंधुदुर्ग आदींच्या नेतृत्वाखाली ही पथके तयार करण्यात आली आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाकडे व्हिडिओ कॅमेरा राहणार आहे. हे पथक भेटी दरम्यान चित्रीकरण करणार आहे. जिल्ह्यात संवेदनशील केंद्र एकही नसल्याने परीक्षा केंद्रात कॅमेरे बसविण्याचे आदेश परीक्षा बोर्डाकडून प्राप्त नाहीत. परंतु केंद्र संचालक यांच्यावर आपल्या कार्यक्षेत्रात कॉपी होवू नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले.

0

4