माजगाव येथे दुचाकीला अपघात;महाविद्यालयीन युवक जखमी…

2

सावंतवाडी ता.०२: दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यावर धडकून झालेल्या अपघातात एक महाविद्यालयीन युवक जखमी झाला आहे.हा अपघात आज सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास माजगाव-गुलाबी तिठा परिसरात घडला.हनुमंत यशवंत नाईक(२१),रा.तळावडे,असे त्या युवकाचे नाव आहे.दरम्यान जखमीला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.

4

4