तुळस पंचायतन देवस्थानचे मानकरी शरद परब यांचे निधन…

2

वेंगुर्ले ता.०२: तालुक्यातील तुळस देऊळवाडा येथील प्रतिष्ठित नागरीक व तुळस पंचायतन देवस्थानचे पूर्व सत्तेचे मानकरी शरद रामचंद्र परब ८० यांचे आज २ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, बहिण, नातवंडे, पतवंडे, नात सून असा मोठा परीवार आहे.
वेंगुर्ले पं.स.चे तत्कालीन उपसभापती व तुळस उपसरपंच कै.नंदकुमार परब यांचे ते वडील होत. पंचायतन देवस्थानमधील बाराच्या पूर्वस देवाचा त्यांच्यावर संचार येत असे.त्यांच्या निधनाची वॄत्त समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तुळस बाजारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

2

4