बांधकामच्या अधिकाऱ्यांना सावंतवाडीतील नागरिकांचा घेराव…

2

सावंतवाडी,ता.०२: येथील गोविंद चित्र मंदिर परिसरातील जुन्या मुंबई-गोवा महामार्गाचे वेळोवेळी रुंदीकरण करण्यात आल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले गटार कमी-कमी होऊन ते पूर्णतः बुजले आहेत.दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणचे पाणी गटारातून न जाता ते येथील स्थानिकांच्या घरात शिरत आहे.त्यामुळे पावसाळ्यापूर्वी याचा बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी आज माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या नेतृत्वाखाली येथील स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता युवराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी संबंधित ठिकाणाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करू,असा शब्द श्री.देसाई यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी पूजा म्हापसेकर,हेमलता म्हापसेकर,महेश नार्वेकर, दर्शना म्हापसेकर,सुमन पन्हाळकर,जयप्रकाश तळवडेकर,नयना शिंदे,मुजीब तुरेकर,किरण पवार आदी उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, संबंधित परिसरातील गटारांचा आकार कमी झाल्यामुळे या ठिकाणाहून वाहणारे पावसाचे पाणी गटारातून न जाता,ते येथील स्थानिकांच्या सरळ घरात शिरत आहे.त्यामुळे याचा त्रास पावसाळ्यात येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर घरात जाण्याचे रस्ते सुद्धा बंद होतात.चिखलातून वाट काढत पावसाळ्याच्या दिवसात लोकांना आपल्या घरात जावे लागते,यावर संबंधित खात्याने पावसाळ्यापूर्वी तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

4

4