Sunday, December 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअल्पवयीन युवतीचा छळ करणार्‍यास पोलिस कोठडी...

अल्पवयीन युवतीचा छळ करणार्‍यास पोलिस कोठडी…

कणकवली, ता.२:  एका अल्पवयीन युवतीचा वारंवार छळ करणार्‍या तरूणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रूपेश मारूती कदम (वय 30) असे त्या संशयिताचे नाव आहे. या संशयिताच्या त्रासाला कंटाळून युवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
युवतीचा वारंवार छळ करणार्‍या तरुणावर दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तर काल (ता.1) त्याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments