वेंगुर्लेतील सातेरी मंदिरात सूर्यकिरण थेट देवीच्या भेटीला

2

 

भाविकांनी अनुभवला अभूतपूर्व किरणोत्सव सोहळा

वेंगुर्ले : ता.३
वेंगुर्ले वासीयांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत श्री सातेरी मंदिरात आज सकाळी सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा अभूतपूर्व सोहळा उपस्थित भाविकांना अनुभवता आला. अवघ्या काही मिनिटांसाठी सूर्यकिरण थेट देवीच्या आरासिवर आल्याचा क्षण याची देही याची डोळा अनुभवता आला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात असा क्षण भाविक अनुभवतात. तसाच क्षण आज वेंगुर्लेच्या ग्रामदैवत श्री सातेरी मंदिरात घडून आला. आज सकाळी ७ ते ७.३० या कालावधीत सूर्यकिरण थेट मंदिरातील गाभाऱ्यात देवीच्या भेटीला काही क्षणाला आल्याचे दिसून आले. यावेळी मंदिरातील मानकरी व भाविकांनी हा सोहळा अनुभवला. उद्या ४ व परवा ५ मार्चला ही असा सोहळा भाविकांना या वेळेतच अनुभवता येणार असल्याचे मंदिर व्यवस्थापना कडून जाहीर करण्यात आले आहे.

5

4