ओजस शाळेचा दर्जा पुन्हा द्या… या मागणीसाठी चराठे येथे लाक्षणिक उपोषण…

2

ओजस शाळेचा दर्जा पुन्हा द्या… या मागणीसाठी चराठे येथे लाक्षणिक उपोषण…

सावंतवाडी,ता.३: चराटे येथील ओजस शाळेचा दर्जा रद्द करणाऱ्या शासनाचा निषेध करण्यासाठी आज तेथील ग्रामस्थांनी शाळेच्या प्रांगणात लाक्षणिक उपोषण सुरू केले.यावेळी लोकांची व पालकांची मागणी लक्षात घेता शाळेचा दर्जा रद्द करू नये. तसेच विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी करण्यात आली.
शाळेचा दर्जा रद्द झाल्यानंतर आज ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार निवडले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षणप्रेमी नागरिक व ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

1

4