बांद्यात कंटेनर थिएटरच्या धर्तीवर “मोबाइल थिएटर…

2

 

 

 

सरपंच अक्रम खान यांची माहिती; नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दहा दिवसात सुविधा…

बांदा, ता.३: आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कंटेनर थिएटरच्या धर्तीवर बांदा शहरात मोबाईल थिएटरच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर असून येत्या आठ दिवसात थिएटरमध्ये पहिला सिनेमा पाहण्याची संधी बांदावासीयांना मिळणार असल्याची माहिती बांदा सरपंच अक्रम खान यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, रेश्मा सावंत, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, भाजप तालुकाध्यक्ष महेश धुरी, मकरंद तोरस्कर, अंकिता देसाई, किशोरी बांदेकर, सिद्धेश पावसकर, गोविंद सावंत, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते.
चित्रपटगृह पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये पहिल्या १०० विद्यार्थ्यांना भाजपतर्फे मोफत चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे प्रमोद कामत यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना यापुढेही ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे कामत यांनी जाहीर केले.

6

4