Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी आठवडा बाजाराच्या जागेचा प्रश्न बैठकीनंतर ही कायम...!

सावंतवाडी आठवडा बाजाराच्या जागेचा प्रश्न बैठकीनंतर ही कायम…!

पुढच्या आठवड्यापूर्वी ठोस निर्णय;आजचा बाजार मात्र जिमखाना मैदानावरच…

सावंतवाडी ता.०३: येथिल आठवडा बाजाराच्या जागेवरून निर्माण झालेला वाद पालिकेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नंतरसुद्धा कायम राहीला.शेवटी आजच्या पुरती जिमखाना मैदानावर दुकाने थाटण्याच्या सुचना पालिका पदाधिका-यांनी सर्व व्यापा-यांना दिल्या.यावेळी उपस्थित काही व्यापा-यांनी जुन्या जागेतच बाजार हवा,अशी मागणी केली.तर काहींनी आपल्या दारासमोर बाजार नको,असे सांगितले.त्यामुळे पुढच्या बाजारा पूर्वी तोडगा काढू,या आश्वासनावर बैठक गुंडाळण्यात आली.
नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली आठवडा बाजाराच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली.यावेळी माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली,उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,मनोज नाईक,परिमल नाईक,नासिर शेख,अनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.
यावेळी दोन्ही बाजूच्या व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मांडली.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपले म्हणणे मांडले.यात बाजार हटविल्यास नेहमीच्या व्यापाऱ्यांना त्याची झळ बसणार आहे,असे स्थानिक व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.मात्र बाजार भरवला जात असल्यामुळे ॲम्बुलन्स सोडा,साधी रिक्षा सुद्धा दारात जाऊ शकत नाही,असे स्थानिक नागरीकांनी सांगितले.त्यामुळे या बाजाराला आपला विरोध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.त्या सर्व चर्चेत हाॅकर्स संघटनेचे पदाधिकारी संदीप निंबाळकर यांनी काही करा,मात्र आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांचा फुटबॉल करू नका, त्यांना हक्काची जागा द्या,अशी मागणी केली. मात्र या सर्व चर्चेनंतर खास समिती नेमून आठवडाभरात योग्य तो निर्णय घेऊ,असे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments