शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तरुण जखमी…

2

सावंतवाडीतील घटना; वेल्डिंगचे काम करताना घडला प्रकार…

सावंतवाडी ता.०३: स्वतःच्या घरात वेल्डिंगचे काम करत असताना शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग विझवताना एक तरुण गंभीर जखमी झाला.ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली उमेश दत्ताराम राणे (४०)रा.खासकीलवाडा,असे जखमीचे नाव आहे.दरम्यान त्याला प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी राणे हे आपल्या घरात वेल्डिंगचे काम करत होते.दरम्यान ज्या इलेक्ट्रिक बोर्डातून वेल्डिंग मशीन ला सप्लाय देण्यात आला होता.त्याठिकाणी शॉर्टसर्किटमुळे अचानक आगीचा भडका उडाला.ही आग विझवण्यासाठी राणे पुढे गेले असता,आगीचा लोळ त्यांच्या अंगावरून गेला.यात त्यांच्या हाताला व चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत.त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

3

4