ओरोस,ता.३: देवगड तालुक्यातील एका शासकीय वेतन अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेत वरीष्ठ लिपिक म्हणून २३ वर्षे सेवा बजावून देखील अचानक आपल्याला सेवेतून कमी केले आहे. तसेच ही संस्था पुनर्नियुक्ती देण्यासही टाळाटाळ करत आहे. या अन्याया विरोधात सोमवार पासून देवगड येथील प्रमोद सोनकुसरे यांनी कुटुंबियां समवेत जिल्हाधिकारी दलनासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा सोनकुसरे यांनी दिला आहे.
देवगड तालुक्यातील या संस्थेत आपण २३ वर्षे वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली आहे. मागील ३ वर्षे आपण विना मोबदला सेवा सुरू ठेवली होती. मात्र अचानक या संस्थेने आपल्याला सेवेतून कमी केले असे प्रमोद सोनकुसरे यांनी निवेदनात म्हटले आहे. संस्थेची भुमिका अन्याय कारक आहे. याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र तेथूनही अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचे उपोषणकर्ते सोनकुसरे यांनी सांगितलंत.
देवगड येथील सोनकुसरे कुंटूबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES