संजू परबांचा इशारा; आठवडा बाजारावरून निर्माण झालेला वाद शमविल्याचा दावा…
सावंतवाडी ता.०३: मी तोंड उघडले तर व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना सावंतवाडी सोडून जावी लागेल,असा टोला लगावत येथील आठवडा बाजारावरून स्थानिक व परप्रांतीय व्यापारी यांच्यात निर्माण झालेला वादंग मी आज शमविला,असा दावा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केला.आजचा आठवडा बाजार जिमखाना मैदानावर लावण्याच्या सूचना नगरपालिकेने दिल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा दुकाने लावण्यावरून व्यापाऱ्यांमध्ये वाद झाले.दरम्यान हे वाद मिटविण्यासाठी पुन्हा येथील नगरपालिकेत स्थानिक व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत तोडगा काढताना श्री परब म्हणाले,येथील उद्या बाजारात भरणारा बाजार त्या ठिकाणच्या नागरिकांना होणारा अडथळा व गैरसोय लक्षात घेऊन तो जिमखाना मैदानावर भरविला जात आहे.दरम्यान याठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारात स्थानिक व्यापाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.त्यासाठी त्यांना विशेष सोई-सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील,व त्यानंतर बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांना तेथीलचं दुसरी जागा दिली जाईल,असे त्यांनी सांगितले.दरम्यान या बैठकीत उपस्थित स्थानिक व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.