शाळा-महाविद्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करा…

2

कपिल पाटील; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केल्यानंतर मागणी…

ओरोस,ता.०३: शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर आता त्याच धर्तीवर शाळा व महाविद्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम कायदा २००९ मधील प्रकरण ४ कलम १९ ए मधील मानके व निकष यांच्या स्पष्टीकरणार्थ २९ एप्रिल २०११ च्या परिपत्रकानुसार १ ते ५ वीच्या शिक्षकांसाठी एका शैक्षणिक वर्षात किमान २०० दिवस काम करणं (घड्याळी ८००तास अध्यापन करणे) व ६ वी ते ८ वीच्या शिक्षकांनी २२०दिवस काम करणे (१००० तास अध्यापन करणे  ) बंधनकारक आहे.

सध्या शाळा व महाविद्यालये आठवड्यातून ६ दिवस सुरू असतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर मुलांना व शिक्षकांना ही ५ दिवसाचा आठवडा करून आठवड्यातून दोन दिवस शनिवार व रविवारी अशी सुट्टी देण्यात यावी. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देणे योग्य आहे, असे आमदार कपिल पाटील यांनी चर्चेत सांगितले. राज्यातील सरकारी कर्मचारी यांना  ५ दिवसाचा आठवडा केला. मात्र या निर्णयातून शिक्षकांना वगळण्यात आले. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून शिक्षकांना ही पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी शिक्षक भारतीच्यावतीने त्यांनी केली आहे.

2

4