Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedअंशता अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील एरियल २० साईज प्रश्न पत्रिका..

अंशता अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील एरियल २० साईज प्रश्न पत्रिका..

राज्यातील पहिली घटना : श्रुती पाटील वेंगुर्ला हायस्कूलची विद्यार्थिनी.

वेंगुर्ले ता.०३:
अंशता अंध व पुर्णता अंध विद्यार्था करिता शासन निर्णय परिपत्रक प्रपत्र अ मध्ये अंशता अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील एरियल २० साईज प्रश्न पत्रिका छापण्याबाबत परिपत्रक शिक्षण विभाग यानी यावर्षी काढले. त्यामुळे या विषया करिता लढा देणारी वेंगुर्ला हायस्कूलची दहावीतील विद्यार्थीनी श्रुती पाटील हिला अखेर न्याय मिळाला असुन मोठ्या अक्ष्ररातील प्रश्न पत्रिका आज तिला मिळाली. या निर्णयामुळे राज्यातील अंशता अंध व पुर्णता अंध विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
अंशता अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील एरियल २० साईज प्रश्न पत्रिका मिळावी यासाठी वेंगुर्ला हायस्कूलची दहावीतील विद्यार्थीनी श्रुती पाटील हिचे आई वडील यानी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या निर्णयाची अमलबजावणी होऊंन मोठ्या अक्ष्ररातील प्रश्न पत्रिका व २० मिनिट ज्यादा वेळ देण्यात आला. त्याच्या निर्णयामूळे राज्यातील सर्व विद्यार्थी न्याय मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments