2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सर्वपक्षीय-नागरिकांचा इशारा ; ६ तारखेला पालिकेवर मोर्चा…
मालवण, ता. ३ : अन्यायकारक शहर विकास आराखड्यात बदल करण्याचे आम्हाला आश्वासन नको तर तो पूर्ण रद्दच करा अन्यथा आम्ही लढ्यासाठी सज्ज असल्याचा इशारा आज सायंकाळी झालेल्या सर्वपक्षीय व नागरिकांच्या सभेत देण्यात आला. अन्यायकारक आराखडा रद्द करण्याच्या मागणीसाठी ६ मार्चला पालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज २५ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली.
दैवज्ञभवन येथे सायंकाळी बैठक झाली. यावेळी सुदेश आचरेकर, जॉन नऱ्होना, आप्पा लुडबे, अरविंद मोंडकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, अमित इभ्रामपूरकर, ममता वराडकर, आप्पा चव्हाण,नाना पारकर, बबलू राऊत, पूजा करलकर, जगदीश गावकर यांच्यासह शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.