जिमखाना मैदानावर बाजार हलविण्यासाठी आमचा विरोध…

2

व्यापारी संघटनेची भूमिका; पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी…

सावंतवाडी ता.०३:  जिमखाना मैदानावर आठवडा बाजार हलवण्यास आमचा व्यापारी म्हणून कायम विरोध राहणार आहे.नगराध्यक्ष तसेच अन्य नगरसेवकांनी बाजार हलविण्याची प्रक्रिया राबवताना आम्हाला विश्वासात घेतले नाही,असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यापारी संघटनेच्या पदाधिका-यांनी केला.दरम्यान या आधीच महामार्ग आणि रेल्वे शहराबाहेरून गेल्यामुळे आता मोठा फटका येथील व्यापाऱ्यांना सहन करावा लागणार आहे.त्यामुळे याबाबतची भूमिका आम्ही व्यापारी बैठक घेऊन स्पष्ट करू,तुर्तास आमचा विरोध कायम आहे.त्याची नोंद पालिका प्रशासनाने घ्यावी,अशी भूमिका यावेळी मांडली.
सावंतवाडी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी अध्यक्ष जगदीश मांजरेकर ,हेमंत मुंज, अनिल सावंत ,प्रतीक बांदेकर ,बाय बोर्डेकर ,अण्णा शिरोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

2

4