ऑलिव्ह रिडले कासवाच्या ८९ पिल्लांना सुरक्षितरित्या जीवदान…

2

शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावरील घटना…

वेंगुर्ला,ता.३:  शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव जातीच्या सुमारे ८९ पिल्लांना मठ वनपाल अ.स.चव्हाण, तुळस वनरक्षक संतोष इब्राामपुरकर, कांदळवन प्रकल्प समन्वयक अमित रोकडे यांच्या उपस्थितीत समुद्री अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले.
शिरोडा-किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालून जातात. ही अंडी निदर्शनास आल्यावर शिरोडा ग्रामपंचायत सदस्य गुणाजी उर्फ आजु अमरे, कासवमित्र आबा चिपकर व बस्त्याव आल्फान्झो ही ती सवरक्षित करून ठेवतात. आमरे यांनी संरक्षित केलेल्या १२० अंड्यांपैकी ३५ पिल्ले तर कासवमित्र आबा चिपकर व बस्त्याव आल्फान्झो यांनी संरक्षित केलेल्या १५० पैकी ५४ पिल्ले काल खड्यातून बाहेर आली. तत्काळ या कासव मित्रांनी वनविभागाला या बाबत माहिती देऊन त्यांच्या उपस्थितीत कासवांच्या पिल्लांना समुद्री अधिवासात सोडले. यावेळी आनंद अमरे, मया गवंडी, समिर भगत, प्रकाश भगत, निमिष अमरे, मदन अमरे आदी उपस्थित होते. तसेक किनाऱ्यावर आलेल्या परदेशी पर्यटकांनी नव्याने जन्मलेली छोटी छोटी कासवाची पिल्ले स्वबळावर समुद्राच्या पाण्यात जातानाचा आनंद लुटला.

1

4