Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedधमकी देणे संजू परबांना शोभत नाही....

धमकी देणे संजू परबांना शोभत नाही….

अमित सामंत; जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी व्यापारी संघटनेच्या पाठीशी…

कुडाळ ता.०३: व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांना धमकी देणे संजू भाऊंना शोभत नाही,आम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यापारी संघटनेच्या पाठीशी ठामपणे उ भे राहू,असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

श्री.सामंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, लोकशाही प्रधान भारत देशात प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा पुर्ण अधिकार आहे.आणि ते मत जगदीश मांजरेकर यांनी व्यक्त केले.म्हणून त्यांना धमकावणे हे नगराध्यक्ष पदाला शोभादायक नाही. संजू परब यांनी स्टाईल वापरताना विचार करून वक्तव्य करावीत.जगदीश मांजरेकर यांच्या बाबतीत “पळता भुई करून सोडू”असे वक्तव्य करून त्यांना धमकी दिली .या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधूदूर्ग तर्फे जाहीर निषेध करत असुन,व्यापारी संघटनेच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहिल
सिंधूदूर्ग जिल्ह्यात दहशतीचे दिवस संपले आहेत.ज्या सावंतवाडी शहरातील मतदारांनी नगराध्यक्ष पदावर बसवले त्याचं शहरातील व्यापाऱ्यांचाही सहभाग आहे.याचे भान संजू परब यांनी ठेवणे गरजेचे होते.पण सत्तेची नशा संजू परब यांच्या डोक्यात शिरली आणि ते भ्रमिष्ट झाले आहेत.आणि त्यामुळेच संजू परब अशी बेताल वक्तव्य करत आहेत.हिमंत असेल तर जगदीश मांजरेकर यांना पळता भुई करण्याचा प्रयत्न करून दाखवावाच.असा इशारा त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments