बाळा गावडे; बाजारावरून निर्माण झालेल्या वादात काँग्रेसची उडी…
सावंतवाडी,ता.०४: येथे भरणारा आठवडा बाजार जिमखाना मैदानावर न भरवता तो शहराच्या मध्यभागीचं असावा,जेणेकरून शहराचे महत्त्व टिकण्या बरोबरचं येथील स्थानिक दुकान व्यवसायिकांना सुद्धा त्याचा फायदा होईल व ग्राहकांना सर्व वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करता येतील.त्यासाठी येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या ठिकाणी पालिकेच्या फंडातून दोन ते तीन मजली इमारत उभारून वरच्या मजल्यांवर हा आठवडा बाजार भरविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत,असा सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी नगराध्यक्ष संजू परब यांना दिला.दरम्यान यापूर्वीच्या नगराध्यक्षांनी येथील व्यापाऱ्यांना व ग्राहकांना विश्वासात घेऊन सर्व निर्णय घेतले आहेत.त्यामुळे श्री.परब यांनी सुद्धा आपली मनमानी थांबवून सर्वांना एकत्र घेऊन यापुढील निर्णय घ्यावेत,असेही त्यांनी सांगितले.आज येथे आयोजित शिवसेना-कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे,शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ,जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा,प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, रश्मी माळोदे,प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.



