Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानसबंदी प्रकरणातील संशयिताला आरोग्य प्रशासनाकडून "अभय"...

नसबंदी प्रकरणातील संशयिताला आरोग्य प्रशासनाकडून “अभय”…

 

नाईक कुटुंबियांचा आरोप ;अटक न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा…

बांदा, ता.४: पाडलोस-केणीवाडा येथील प्रशांत नाईक यांची चुकीच्या पद्घतीने नसबंदी शस्त्रक्रिया होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला तरीही संशयितांवर कारवाई झालेली नाही. प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा नाईक कुटुंबियांचा आरोप आहे. येत्या आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई न झाल्यास ११ मार्च रोजी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर लहान मुलांसमवेत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा पत्नी सौ. प्रतिक्षा नाईक यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांसह कणकवली आ. नितेश राणे यांचेही लक्ष वेधले आहे.
पाडलोस गावात गवंडी कामगार प्रशांत नाईक यांच्यावर बळजबरी नसबंदी शस्त्रक्रिया झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. पत्नीची नसबंदी होऊनही केवळ कागदोपत्री टार्गेट पूर्ततेसाठी ही शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे. हा गुन्हा असल्याचे सांगून संबंधितांवर कारवाई करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांनी मान्य केले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.
त्यामुळे पिडीत प्रशांत नाईक यांच्या पत्नी प्रतिक्षा नाईक यांनी नाईलाजास्तव आमरण उपोषण करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. येत्या आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई न झाल्यास ११ मार्च रोजी दोन लहान मुलांसमवेत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह आ. नितेश राणे यांचेही याप्रकरणी लक्ष वेधले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments