Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याफोंडाघाट येथे मोटारसायकल जळाली...

फोंडाघाट येथे मोटारसायकल जळाली…

दोघा संशयितांवर गुन्हा: पूर्ववैमनस्यातून जाळपोळीचा संशय

कणकवली, ता.०४: तालुक्यातील फोंडाघाट-बावीचे भाटले येथे मध्यरात्रीच्या सुमारास अंगणात उभी करून ठेवलेली मोटारसायकल जळाली आहे. या प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस (वय 24) यांनी त्या भागातीलच दोघांवर संशय व्यक्त केला आहे. आपली बहीण कॉलेजमध्ये जा-ये करताना दोघे संशयित तिला त्रास देत होते. त्याबाबतची विचारणा केल्याच्या रागातून मोटारसायकल जाळपोळ केल्याचा आरोप फिर्यादी फर्नांडीस यांनी व्यक्त केला आहे.
फोंडाघाट येथील श्री.फर्नांडिस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी आपली मोटारसायकल (एमएच 07 एए 8210) ही बावीचे भाटले येथील विनोद प्रभू यांच्या अंगणात उभी केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास फर्नांडीस हे आपल्या घराच्या बाथरुमध्ये आले असता त्यांना दुचाकी जळत असल्याचे दिसून आले. तसेच दुचाकीजवळ जयेश विजय परब व अन्य दोघे तेथे असल्याचेही निदर्शनास आले. फर्नांडीस हे मोटरसायकल जवळ गेले असता परब व अन्य दोघे तेथून पसार झाले. जयेश परब हे संशयित आरोपी आपल्या बहिणीला महाविद्यालयात येता- जाताना त्रास देत होते. याचा आपण जाब विचारला होता. त्या रागातून त्यांनी हा प्रकार केला असून यामुळे 45 हजाराचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
——

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments