व्यापा-यांनी व्यापारासारखे रहावे,शिवसेनेला घेवून राजकारण नको…

2

संजू परबाचा इशारा;संजय पडते बाळा गावडे यांच्यावर संकासूर बिलीमारे म्हणून टीका…

सावंतवाडी ता.०५: येथील आठवडा बाजार हा जिमखाना मैदानावरच राहणार आहे.या निर्णयाबाबत सावंतवाडीची जनता संतुष्ट आहे.त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी व्यापा-यासारखे राहावे,या प्रश्नात शिवसेनेला सोबत घेऊन राजकारण आणू नये,कोणत्याही धमकीला मी भीक घालणार नाही,असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला .दरम्यान आपल्यावर या प्रश्नातून टीका करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते हे दशावतारातले
संकासुर तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे हे बिलीमारे आहेत.अशी खोचक टिका करत त्यांच्यावर न बोललेले बरे,अशा लोकांना मी खिशात घालून फिरतो,असाही टोला श्री.परब यांनी लगावला.
यावेळी नासिर शेख,केतन आजगावकर उपस्थित होते.

2

4