Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवलीचे सुपुत्र, हायकोर्ट न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांचा ८ रोजी सत्कार...

कणकवलीचे सुपुत्र, हायकोर्ट न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांचा ८ रोजी सत्कार…

कणकवली तालुका बार असोसिएशनच्यावतीने आयोजन…

कणकवली, ता.५ ः कणकवलीचे सुपुत्र न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांची अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने कणकवलीच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यानिमित्ताने कणकवली तालुका बार असोसिएशनच्यावतीने न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांचा गौरव सन्मान सोहळा रविवारी (ता. ८) सायंकाळी ४ ते ६ यावेळेत येथील भगवती मंगल कार्यालयात होणार आहे.
या गौरव सत्कार सोहळ्यानिमित्त स्वागत समितीची स्थापना करण्यात आली असून यात अ‍ॅड. बी. एम. दळवी, अ‍ॅड. उमेश सावंत, अ‍ॅड. राजेश परुळेकर, अ‍ॅड. सौ. एन. एन. म्हापणकर यांचा समावेश आहे. न्या. सुरेंद्र तावडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कणकवली येथेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ व एस. एम. हायस्कूल येथे झाले. त्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित सोमय्या महाविद्यालयातून बी. काम. झालेल्या श्री. तावडे यांनी रूपारेल विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळविली आणि माजगांव-मुंबई येथे आपल्या वकिली व्यवसायाला सुरवात केली. सन १९९० मध्ये लातूर – निलंगा येथे दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून त्यांनी न्यायपालिकेत पदार्पण केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments