अफवा नको,सिंधुदुर्गात कोरोनाचा एकही रुग्ण नाही…

2

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन;आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचा दावा….

ओरोस ता.०५:  कोरोना व्हायरस बाबत घाबरून जाण्याची आवश्यकता नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही. सोशल मीडियावर याबाबत काहि चुकीचे संदेश आणि अफवा येत असून त्यावर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत केले.
विदेशातील या कोरोना व्हायरस आजाराबद्दल दक्षता म्हणून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी स्वतंत्र कक्ष, आवश्यक औषधसाठा, आवश्यक मास्क तसेच हेल्पलाइन नंबर आधी व्यवस्था तैनात ठेवण्यात आले आहे. दरम्यान या सर्व व्यवस्थेची जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्हा रुग्णाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना स्वच्छतेचे आणि दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सौ शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलीफे, जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण आदी उपस्थित होते.
या आजाराला घाबरण्यासारखी या जिल्ह्यात कोणतीही परिस्थिती नाही. सोशल मिडियावर चुकिच्या बातम्या येत असतात. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी, हातांची स्वच्छता राखणे, गरजेनुसार हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, आदी दक्षता घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. मास्कचा साठा जिल्हा रुगालय तसेच जिल्हा परिषदे आरोग्य यंत्रणेकडे आहे. तसेच यासाठी आवश्यक असलेले एन ९५ प्रकारचे मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. हे मास्क फेस मास्क किवा पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट जादा किंवा अवाजवी भावाने कोणी विकत असेल तर त्यांची तक्रार अन्न व ओषध प्रशासनाकडे करावी असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. सार्वजनिक ठिकाणी असलेली शौचालये तसेच हॉटेल्स याठीकाणी असलेले पाण्याचे नळ किंवा त्याची स्वच्छता वारंवार केली जावी अशाही सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वसेकर यांनी केल्या आहेत.

2

4