निरवडे झरबाजार येथील ट्रांसफार्मरच्या फ्यूज पळविल्या…

2

अज्ञात चोरटयाकडून प्रकार; ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात खबर…

सावंतवाडी/निखिल माळकर,ता.०५: निरवडे-झरबाजार येथील ट्रांसफार्मरच्या फ्यूज अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याचा प्रकार आज उघडकीस आला.त्यामुळे परिसरातील लोकांना काहीवेळ विजेपासून वंचित राहावे लागले, ही घटना आज दुपारी उघडकीस आली.दरम्यान या बाबतची खबर स्थानिकांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज दुपारच्या सुमारास कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने तांब्याच्या धातू साठी ही चोरी केली असावी,असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील अजित वैद्य,वायरमन संदीप फुके,नयनेश गावडे,नाना गावडे,भरत माणगावकर,आनंद गावडे,अर्जुन पेडणेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

9

4