वेंगुर्ला.ता,०६:
वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-वाघेश्वरवाडी येथील गणपती मंदिरात स्थानापन्न करण्यात आलेल्या श्री गणपतीचे आज रात्री भव्य मिरवणूक काढून उभादांडा-सागरेश्वर समुद्रात विसर्जन करण्यात आले.
गणपती मंदिरात सायंकाळ पासूनच दर्शनासाठी भाविक येत होते. उशिरा ढोलताशांच्या गजरात सागरेश्वर किनारी वाजत गाजत गणपतीचे विसर्जन करण्यात आले. उभादांडा येथील गणपती मंदिरातील प्रथा वेगळी आहे. या मंदिरात दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजना दिवशी नवीन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि होळीच्या आधी या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. या वर्षी हे विसर्जन आज झाले.
उभादांडा येथील गणपतीचे थाटात विसर्जन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES