बेकायदा वाळू उत्खननावरून सातोसेत एक हाणामारी…

2

दोघे जखमी;अधिक उपचारासाठी गोवा बांबुळीत हलविले…

बांदा.ता,०६:  बेकायदा वाळू उत्खननावरुन सातोसे-देऊळवाडीत आज दुपारी प्रचंड हाणामारी झाली. वाळू उत्खनन बाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या
विजय अनंत मांजरेकर (४५, सातोसे देऊळवाडी) यांना चंद्रकांत सुरबा नागवेकर (७२) यांनी लोखंडी सळीने मारहाण केली. तर नागवेकर यांना मांजरेकर यांनी फावड्याने मारहाण केल्याचे पोलीसांनी सांगितले. दोन्ही जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दोनही जखमींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी जखमींवर उपचार केले. अधिक उपचारासाठी दोन्ही जखमींना बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. वाळू उत्खननातील शिरोडकर नामक मुख्य सुत्रधार फरार झाल्याचे जखमी मांजरेकर यांनी पोलीसांना सांगितले. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे.

2

4